योगासने

योगा, सिद्धासन
क्रिया :
१) दंडासनात बसून डावा पाया दुमडून टाचेला सिवनीवर (गुदा वा उपस्थेंद्रीयाच्या मध्य भागावर) लावा.
२) उजव्या पायाच्याटाचेला उपस्थेंद्रीयाच्या वरील भागावर स्थिर करा.

३) डाव्या पायाच्या घोट्यावर उजव्या पायाचा घोटा पाहिजे. तळपाय, जांघा वा पोट-यांच्या मध्ये असावे.
४) गुडघे जमिनीला टेकलेले असावेत. दोन्ही हात ज्ञान मुद्रेच्या स्थितीत गुडघ्यावर टेकून ठेवा.
५) पाठीचा कणा सरळ असावा. डोळे बंद करून दोन्ही भुवयांच्या मध्ये मन एकाग्र करा.
लाभ :
१) सिद्धान्द्वारा सेवित होण्याने याचे नाव सिद्धासन आहे. ब्रह्मचर्याची रक्षा करून ऊर्ध्वरेता बनवते.
२) कामाचा वेग शांत करून मनाची चंचलता दूर करते.
३) मुळव्याध वा यौन रोगांसाठी लाभदायक आहे.
४) कुंडलिनी जागृतीसाठी हे आसन उत्तम आहे.


मकरासन ,
क्रिया :
१. जमिनीवर पालथे झोपा. हात दुमडून तळवे एकमेकांवर ठेवा.
२. माथा दोन्ही हातावर टेकवून ठेवा. पायात एक फूटाचे अंतर असावे.
३. शरीराला प्रेतासारखे शिथिल सोडा. या आसनात झोपून तुम्ही प्रेताचे ध्यान करा आणि विवेकपूर्वक चिंतन, मनन करत स्वत:ला आत्मकेंद्रित करा. मी या शरीरापासून पृथक, शुद्ध-बुद्ध, आनंदमय व अविकारी चैतन्य आत्मा आहे. हे शरीर तर नश्वर आहे. हे शरीर केवळ पंचतत्वांचा समूह आहे.
जेव्हा वेळ येईल तेव्हा हे शरीर पंचतत्वात विलीन होऊन जाईल. हे शरीर व इतर संपत्ती इथेच राहून जाईल. ना तर बरोबर काही आणले होते ना काही घेऊन जाणार. अशा प्रकारे या नश्वर जगातून आपले चित्त हटवून अनंत ब्रह्मांडात बसलेल्या अनंत ब्रह्मात स्वत:ला समाहित समर्पित करत आनंदाची अनुभूती करा.
लाभ :
१. हे विश्रामासाठी आसन आहे. विश्रामात केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक रूपानेसुद्धा व्यक्ती स्वत:ला हलके अनुभव करते. उच्च रक्तदाब, मानसिक तणाव व अनिद्रेपासून मुक्ती मिळते. आसन करताना मधून मधून विश्रामासाठी हे आसन करावे. पोटाचुआ आतड्यांना आपोआपच मालीश होते ज्यामुळे सक्रिय होऊन मंदाग्नी इत्यादी विकार दूर होतात.
२. हातांच्या स्थितीत पॅसिव्ह स्ट्रेचिंग कंडिशन होण्याने पॅरा सँपेथेटिक नर्व्हज प्रभावित करून शरीराला शिथिल सोडण्यात मदत मिळते.
३. ह्रदयाला गुरूत्वाकर्षाच्या विरूद्ध कार्य न केल्याने ह्रदयाला विश्राम मिळतो.
४. अंत: स्त्रावे ग्रंथी लाभान्वित होतात.


 उष्ट्रासन
क्रिया :
१. वाज्रासानाच्या स्थितीत बसा.
२. आता टाचांना वर करून त्यावर दोन्ही हात ठेवा. हात असे ठेवा की अंगठा आता वा बोटे बाहेर असतील.
३. श्वास आता घेऊन डोके व मान मागे झुकवून कंबर वर उचला. श्वास सोडत टाचांवर बसा हीच क्रिया ३-४ वेळा करा.
लाभ :
१. हे आसन श्वसन तंत्रासाठी खूपच लाभकारक आहे. फुप्फुसांच्या पेशी सक्रीय होतात ज्यामुळे दम्याच्या रोग्यांना लाभ होतो.
२. सर्वाइकल, स्पाँडीलायटीस व सायटिका इत्यादी समस्त मेरुदंडाचे रोग दूर होतात.
३. थायरॉइडसाठी लाभदायक आहे.



4) शीर्षासन
क्रिया
१. एखाद्या लांब वस्त्राची गोलाकार गादी बनवा. दोन्ही हातांची बोटे एकमेकात गुंतवा व कोपर्यापर्यंत हात जमिनीवर टेकवा. गुंडाळी हातांच्या मध्ये ठेवा.
२. डोक्याचा वरचा भाग गादीवर व गुडघे जमिनीवर टेकलेले असावेत. आता शरीराचा भार मानेवर व कोपरांवर संतुलित करत पायांना जमिनीच्या समानांतर सरळ करा.
३. आता एक गुडघा दुमडत वर उचला व त्यानंतर ताबडतोब दुसरा गुडघाही वर उचलून दुमडून ठेवा.
४. आता दोन्ही गुडघ्यांना एक एक करून वर उचलण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला घाई करू नका. हळू हळू पाय सरळ करा. जेव्हा पाय सरळ होतील तेव्हा एकमेकांना जोडून सुरूवातीला थोडे पुढे वाकवून ठेवा नाही तर मागे पडण्याची भीती असते.
५. डोळे बंद ठेवा, श्वासोश्वासाची गती सामान्य राहू द्या.
६. ज्या क्रमाने पाय वर केले होते त्याच क्रमाने परत पूर्व स्थितीत आणायला पाहिजे. आपल्या प्रकृतीनुसार शीर्षासनानंतर शवासन करा किंवा उभे रहा, त्यामुळे रक्ताचा प्रवाह मस्तकाकडे जात होता, तो पूर्ववत होईल.
लाभ -
१. हे आसन सर्व आसनांचा राजा आहे. याने मेंदूला शुद्ध रक्त मिळते ज्यामुळे डोळे, कान, नाक इत्यादींना आरोग्य मिळते. पिट्युटरी व पीनियल ग्लॅण्डला निरोगी करून मेंदू सक्रिय होतो. स्मृती, मेधा व धारणा शक्तीचा विकास होतो.
२. पचनतंत्र, आमाशय, आत्र व यकृताला सक्रिय झाल्याने जठराग्नी प्रदीप्त होतो. आंत्रवृद्धी, आंत्रशोथ, हिस्टीरिया व अंडकोष वृद्धी, हार्निया, बद्धकोष्ठता, व्हेरिकोज व्हेन्स इत्यादी रोग दूर होतात.
३. थायरॉइड ग्लॅण्ड सक्रिय होतात. अशक्तता व लठ्ठपणा दोन्ही दूर होतो. कारण या दोन्ही व्याधी थायरॉइडच्या क्रिया अनियमित होण्याने होतात.
४. थायरॉइड ग्लॅण्ड सक्रिय होऊन ब्रह्मचर्य स्थिर होते. स्वप्नदोष, प्रमेह, नपुंसकता, वांझपणा इत्यादी धातूरोगांचा नाश होतो.
५. अकाली केस गळणे व पांढरे होणे दोन्हीही दूर होते.
सावधगिरी -
१. ज्यांचे कान वाहतात किंवा कान दुखतात त्यांनी हे आसन करू नये.
२. जवळचा चष्मा असेल किंवा डोळे जास्त लाल असतील तर करू नये.
३. ह्रदय व उच्च रक्तदाब व कंबर दुखत असणार्या रोग्यांनी हे आसन करू नये.
४. अवघड व्यायाम केल्यानंतर ताबडतोब शीर्षासन करू नये. हे आसन करताना शरीराचे तापमान सम असावे.
५. सर्दी, पडसे इत्यादी झाल्यावर हे आसन करू नये.

5)कर्ण पीडासन
क्रिया -
१) जमिनीवर सरळ झोपा. श्वास आत घेऊन हळू हळू पाय उचला.
२) आधी ३० डिग्री, मग ६० डिग्री, मग ९० डिग्री उचलल्यानंतर श्वास बाहेर सोडत पाठ उचलत पायांना डोक्याच्या मागे न्या. सुरुवातीला हातांना आधारासाठी कंबरेच्या मागे लावा.
३) हळू हळू पायांना डोक्याच्यामागे टेकवून दोन्ही गुडघे वाकवून कानांना लावा. श्वासाची गती सामान्य ठेवा. पूर्ण स्थितीत आल्यावर हात जमिनीवर सरळ ठेवा. अशा स्थितीत ३० सेकंद रहा.
४) परत पूर्वस्थितीत येताना जमिनीवर हातांनी दाब देत गुडघे सरळ ठेवत पाय उचलून परत जमिनीवर टेकवा.
लाभ -
१) हलासनाप्रमाणेच मेरुदंड निरोगी व लचकदार होतो व पृष्ठभागाच्या मांसपेशींना विस्तृत व निरोगी बनवते.
२) थायरॉईड ग्रंथी तरतरीत होऊन लठ्ठपणा, बुटकेपणा व अशक्तपणा दूर होतो.
३) अजीर्ण, मंदाग्नी, बद्धकोष्ठता व हृदयरोगात लाभकारक आहे.
४) अग्न्याशय सक्रीय होवून डायबिटीज बरा होतो.
५) कष्टार्तव इत्यादी स्त्री रोगात उपयोगी आहे.
६) कानाच्या रोगात विशेष लाभकारक असल्याने या आसनाचे नाव कर्ण पीडासन आहे.
सावधगिरी - उच्च रक्तदाब, सर्वाइकल व मेरुदंडात टी. बी. इत्यादी विकार असल्यास हे आसन करू नये.



No comments:

Post a Comment